

कोल्हापूर - जिल्ह्यात आज दिवसभरात 82 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. आता पर्यत 4098 इतका कोरोना बाधितांचा आकडा गेला आहे तर 102 बाधितांचा मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले. अशात सीपीआरमधील बेडची संख्या अपुरी पडू लागली. बाधितांवर महापालिका, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, इचलकरंजी, गडहिंग्लज येथील शासकीय, तसेच कोल्हापुरातील अन्य तीन खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लॉकडाउन सुरू असताना कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या गेल्या पाच दिवसांत सर्वाधिक आहे. त्यामुळे चिंतेत भर पडत आहे. यात करवीर तालुक्यातील दाटीवाटीच्या वस्तीत सर्वाधिक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत.ज्या भागात घराला घर लागून आहे किंवा एकमेकांच्या घरी जाणे-येणे आहे, अशा ठिकाणी कोरोना संसर्ग ठळकपणे पसरत असल्याचे दिसत आहेत.
नागरिकांनी घ्यावी काळजी
संपादक - मतीन शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.